मधाळ राती चंदेरी दुनियेत
स्वप्नांशी गप्पा मारणारी
प्रेमाचा निखळ आनंद घेणारी
मनाच्या आरशात डोकावून
हलकेच लाजणारी
गालावरच्या खळीला आणि
कपाळावरच्या लटेला सावरणारी
उशिच्या कुशीत गुलाबी थंडीत चादरी आड लपलेली ती
ओसारलेल्या क्षणांना आठवत येउ घातलेल्या उद्याची स्वप्ने रंगवत बसलेली ती
मिटलेल्या पापण्यांत मला शोधणारी
क्षणभर लपून परत समोर येणारी
कधी रुसनारी अन गालातल्या गालात लाजणारी अशी ती
स्वप्नांच्या दुनियेत रमलेली
निस्वार्थ अस प्रेम करणारी
आपल्याच भाव विश्वात जगणारी
ती फ़क्त अन फ़क्त माझी सोनपरी
फ़क्त माझीच आहे ती
-निलेश वि. खरात