Saturday, June 22, 2013

....तुझ्या वरच माझ प्रेम ....



तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं
 

कुठ तरी दुर
डोंगराच्या पल्याड लपलयं ...

उघड्या डोळ्यानी तुझे
स्वप्न बघत बघत

हे ह्रदय आता थकलयं

तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं ...

आपण एकाच दोरिचे
दोन टोकं आहोत हे
आता ह्या वेड्या
मनाने ओळखलयं

तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं.....

तुझ्या ह्रदयातली
प्रेमाची कळी
माझ्यासाठीही
फुलेल कधीतरी

ह्या आशेवर
ह्रदयानं धडकनं बंद केलय

तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं....

तुझ्या आठवणीत त्यान
आता रमायचं सोडलयं

सगळ विसरुन
नव्यानँ सुरुवात करायची
असं ठरवलयं

तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं
-निलेश वि. खरात

No comments:

Post a Comment