Saturday, June 22, 2013

सर पावसाची ........!

पावसाच्या शांत सरिने
चिंब भिजवली तिला
नाजुक नाजुक गालांवर तिच्या
दवबिंदू दाटला
रुप तिचं ते देखणं होतं
काय ते तिच स्मितहास्य
अनं काय तिच ते मटकणं होतं
भुरळ घालेल कुणालाही
असं तिचं ते लाजणं होतं
कोमल असे तिचे ते हातं
ओल्या केसांना हलकेच सावरत होते
प्रेमळ असे ते पावसाचे थेंब
तिच्या केसांतुन झुरत होते
फक्त आणि फक्त
वेड मनाला लावत होते
आजही त्याच पावसाच्या
सरिची वाट पाहत आहे
स्वप्नं त्या परिचे
अजुनही मनी रंगवत आहे
येईल परत ती सरं जीवनी
ह्या आशेवर जगत आहे......
- निलेश वि. खरात

No comments:

Post a Comment