Sunday, December 20, 2015

संकल्प

....
औरंगाबाद शहरामंदी संकल्प नावाचं ठिकाण आहे
अनेक ठिकाणाहून आलेल्या बेरोजगारांच्या मनात आशेलां स्थान आहे
जिथं चिल्लर चा खणखणाट आणि चिंध्यांची बरसात आहे
कुठे मिथुनचा थरथराट तर झूमचा वर्षाव आहे
दिवसभर झटणाऱ्या बोडखे सरांच मात्र इंग्लिशसारखं चहावर पण जिवापाड प्रेम आहे
माईचान चा भडीमार आणि काय सांगू राव तुम्हाला इथं कोपच्यात पण ज्ञान आहे
इथं कोपच्यात पण ज्ञान आहे....
आमच्या मनात ज्याचं आदरांच स्थान आहे
असं हे संकल्प नावाचं ठिकाण आहे
-निलेश वि . खरात

Monday, June 29, 2015

रात्र

रात्र सरत चालली माणसे निजाया निघाली
कोणी रंगवित स्वप्ने निजे मखमली गादीवरी
कुठे भरती फूटपाथे भाकरिचा तुकडा त्यों ध्यानी
कोणी कोसळतो मुसळधार फार अश्रुंसंगे
कोणी आनंदी तो पार गुलाबाच्या कळी वाणी
काही बांधतात पुल कोन्या प्रेमाच्या गावात
कोणाची उन्मळून पडती स्वप्ने जणू पत्याच्या बंगला
रात्र अलबेल सारी प्रत्येकाच्या सोयीची
स्वप्नी साऱ्यांचीच फुलती ह्या काळोखाच्या क्षणी
ही किमयाच रात्रीची एका शांत अंधाराची
अफाट शुकशुकटाची गजबजलेल्या शहराची अनोख्या धुंदीची कहाणी वेगळ्या जगाची
उरी बाळगुण स्वप्ने वाट पुन्हा त्या पहाटेचि....
-निलेश वि. खरात