Thursday, August 18, 2016

ती...

टपोऱ्या डोळ्यातुन तिच्या
आनंदाची सर बरसते ...
अल्लड गालातल्या गालात हसण्याने
मनाला प्रसन्नता लाभते ...
काय जादू आहे काय माहिती तिच्या निरागसतेत,
तिच्या नसण्याने काहीतरी हरवल्याची जाण होते ...
अन असण्याने सुगंधी स्वप्नांची चाहूल लागते....
#epic_friendship
#smile_forever
#luck_by_chance
#charming
#nileshk256
-निलेश वि. खरात

बहिण...

बहिणीचं प्रेम ते
अथांग समुद्रा सारखं..।
निखळ असं नातं
आयुष्यभर जपण्याचं..।।

इथें असतो फक्त जिव्हाळा
अन असतो अतुट विश्वास..।
बंधन नसतं कुठलं ज्यात
निर्मळ हास्यचं असतं खास ..।।

सोन्याहून सुदंर असं
जगात अनमोल ..।
नातं असं हे आपुलकीचं
भाऊ बहिणीच्या प्रेमाचं..।।

#रक्षाबंधन
#प्रेम #जिव्हाळा
#विश्वास #आपुलकी
#my_poems
#nileshk256
-निलेश वि.खरात

Wednesday, August 10, 2016

ऑफिस खिडकी आणि चहा

११ वाजल्यावर म्हणे दर्शन क्लासला तू देतोस..
उशिरा येऊन क्लासला ऑफिस मध्ये जाऊन बसतोस...
थोडा टाईमपास झाल्यावर खिडकीची तुला आठवण येते..
येता आठवण आपली गाडी ग्यालरीत येऊन थांबते..
ग्यालरीतून सारखं मध्ये डोकावत असतोस..
ती विचारते मला कोणाकडे रे तू बघत असतोस..?
मन भरलं कि तुला तलप चहाची लागते..
मग काय ग्यालरीतली गाडी तुक्याकडे वळते,
तुक्याकडे नुसत्या उनाडक्या तू करतोस..
तासनतास टाईम रिकामाच वाया घालावतोस..
असं करता करता वेळ टेस्टची होते..
दिवसंभरातून एकदा का होईना गाडी अभ्यासाकडे वळते ..
दिवसभरचा स्टडी एवढाच तू करतोस..
बाकी नुसता तुझा टाईमपास असतो...
म्हणण्यानुसार तिच्या ऑफिस खिडकी. आणि चहा हा सगळा फक्त टाईमपास आहे
कसं सांगू हे तिला हे माझं तात्पुरता डेली रुटीन आहे ..
तिच्या एवढं एकसारखं अभ्यासाला बसणं किमान माझ्यासाठी तरी कठीण आहे ।।।

#nileshk256
#thank_you_for_idea

Tuesday, August 2, 2016

चाहुल

मंद वारा अन
ते निरागस चंद्र तारे
झोपेची वेळ होता
तुझ्या स्वागतास सारे सज्ज झाले
ती वाट स्वप्नांचीहि बघ आता बहरली
जणू तिलाही तुझ्या येण्याची चाहुल लागलीं...
#gn_sd_tc
#my_poems
#nileshk256

गुरुजन

प्रथम वंदनीय तो
आयुष्याचा तो मार्गदाता
आदरणीय असा तो
जगाचा बुद्धिदाता

सदैव नतमस्तक तया
चरणी हा देह केला
ऐसा गुरुजन
मज ह्या जन्मी लाभला...

#सदैव_तुमचा_ऋणी ...
#Mentors
#Respect
#Strength
#nileshk256
#माझ्या_कविता ....

मैत्रीण

समोर येता हडबडणारी
डोळ्यांनीच सर्वकाही बोलून जाणारी
गालातल्या गालात गोड हसणारी ...तू

निरागस चेहरा अबोल शब्द
स्वतःच्याच भाव विश्वात रमणारी ...तू

कोणी काही उलट सुलट बोललं तर शब्दांना धार लावून भड भड रागावणारी ...तू

स्वतःलाच कच्चा लिंबू ,ढ म्हणून घेणारी अन खडूस असण्याचा आव आणणारी ...तू

जशी शांत पावसाची सर यावी अन मनाला प्रसन्न करून  जावी
अशी नशिबाने लाभणारी मैत्रीण ...तू

#मैत्रीण
#निरागस
#खडूस
#माझ्या_कविता
#nt_besties_frnds_by_luck
#nileshk256

सोनपरी

उमलता कळी ती चाफ्याची
नादावला बघ तो अल्लड वारा
अबोल तुझ्या त्या नजरेने
मनी फुलला मोर पिसारा

तुझ्या सावलीच्या चाहुलीने
सुखावला बघ तो चंद्र सारा
निरागस तुझ्या हास्याने
वेडावला हा जीव बावरा....

#सोनपरी
#स्मितहास्य
#माझ्या_कविता
#nileshk256
#औरंगाबाद
#९०२८१०४३७७