कधीतरी चुकून......!
कधीतरी चुकून
तिला माझी आठवण यावी
आठवण आल्यावर ती
कावरी बावरी व्हावी
त्याच वेळी मी
तिची आठवण काढावी
आणि तिला उचकी लागावी
काही केल्या तिची
उचकी न थांबावी
कधीतरी चुकून
अशी संध्याकाळ यावी.....
कधीतरी तिला
माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी
कधीतरी
तिच्या मनातील कोमल कळी
माझ्या नावाने उमलावी ......
कधीतरी चुकून
अशी संध्याकाळ यावी.....--निलेश वि. खरात
No comments:
Post a Comment