Friday, July 15, 2016

।। माऊली माऊली ।।

आस भेटीयाची तुझ्या
लागली रे पांडुरंगा ।
पाऊले चालती वाट
येण्या पंढरपुरा ।।

टाळ मृदूंगचा
दुमदुमला तो नाद।।
श्वासातून घुमला आवाज
विठ्ठल विठ्ठल ।।

ऊन वारा असो वा पाऊस
मनी फक्त तुझीचं रे भक्ती ।
आम्हांला बळ देते
सर्व तुझीचं रे हि शक्ती ।।

तुच आमचा वाली
तुच माय बाप ।
नतमस्तक हा देह
तुझ्या चरणी ।।

पाहण्या रूप तुझें आता
कासाविसला हा जीव ।
मणी एकच ध्यास
ती वाट गाभाऱ्याची।

ओढ तुझीया भेटीची
मुखी फक्त अभंगा ।
नावं तुझे रे
गोड पांडुरंगा ।।

माऊली माऊली
नाद एकच घुमला ।
जेव्हा मंदिराचा
कळस तो दिसला ।।

सावळे सुंदर असे
रूप ते मनमोहक ।
डोळे दिपवतो वारकरीचे
असे तेज तुझे ।।

चंदनाचा लेप माथी
गळी तुळशीमाळ ।
विटेवरी उभा बघा
तो माझा पांडुरंग ।।
#देव_माझा_विठु_सावळा

-निलेश वि. खरात
  औरंगाबाद

Wednesday, July 13, 2016

तू

तू जेंव्हा हसतेस
भलतीच गोड दिसतेस
तू जेंव्हा रागवतेस
काटकोणात बसतेस
तू जेंव्हा रुसतेस
भलतीच अल्लड वाटतेस
तू जेंव्हा लाजतेस
हृदयात  घर करतेस..
#Dream_girl
#Epic_love
#nileshk256

पहिला पाऊस

तुझ्या अंगावर बरसणारा
तो पाऊस व्हायचंय मला
तू जेंव्हा पावसात भिजशील तेंव्हा
तुझ्या नाजूक हातांवरून ओघळणारा अन
ओल्याचिंब केसांतून झुरणारा
तो पावसाचा थेंब व्हायचंय मला..
पावसाच्या सरींना ओंजळीत घेशील तेंव्हा
त्या ओंजळीतली सर व्हायचंय मला
पावसाच्या थेंब जमिनीवर पडेल
तेंव्हा तुझ्याया श्वासातून शरीरात जाणारा
तो सुगंध व्हायचंय मला
#पहिला_पाऊस
#स्वप्नपरी
#पावसाची_सर
#तु_माझी_सावली
#epic_love
#nileshk256

रंग

चोरुनी नेला रंग जरी
रूप तिचं देखणंच आहे
मुसाफिरास वेड लावाया
रूप ते काफी हाय...
#सावलीचा_निलेश

आस पावसाची

अरे पावसा तुझा
मेळ काही कळेना
किती निष्ठुर तुझा
हा खेळ काही उमजेना..।

वाट तुझी रे किती बघायची
जीव टांगला वेशीला
पुरे झाला हा रुसवा आता
धरणी आसुसली भेटीला..।

जीव सर्वांचा तळमळला
हुलकावणी तुझी सुरूच आहे
डोळे दिपले आकाशाकडे
आता फक्त तुझीच आस आहे..।

नको रे देऊ पुन्हा
तू आमच्या हातावरती तुरी
ओसाड झालीत रे
सारी आता माळराणांची धुरी..।

सुकलेत डोळ्यातले अश्रू सारे
आता वेळ दवडवू नको
येरे वेड्या आता
इतका अंत पाहू नको..।

येणा एकदा बरसत जोरात
नेसु दे हिरवा शालु धरणीला
थोर होतील उपकार तुझे
देशील ओ जर हाकेला..।

आस तुझी रे फक्त पावसा
तृप्त कर तू भु मातेला
तृप्त कर तू भु मातेला..।

- निलेश वि खरात
औरंगाबाद .(9028104377)

नजर

लागली ओढ तुझ्या त्या
अल्लड हास्याची,
न जाणतो मी कुठें नेईल मजला
ही निरागसता तुझ्या डोळ्यांची..।
बहरेल बाग ती सारी
सावळ्या स्वप्नांची
होईल जेंव्हा अनोळखी
ती नजर ओळखीची...।
#dream_girl
#epic_love
#nileshk256

मन....

तिचं Dilemma मन
माझ्या मनाला ही आता Queer करतं
करणार काय खेळ Fate चा सगळा
कितीदा Expound केले त्याला
Howbeit ते तुझी वाट पाहतं
खर सांगु तुझ्या Mala वरच्या खळीला बघीतल्या शिवाय मनाला Anymore करमत नाही
त्यालाही तुझा Bereft सहन होत नाही
तुझ्या गोड हसन्याची Affinity त्याला
Tranquil बसु देत नाही
कसही असलं तरीही माझचं Phren ते
त्यालाही मी आता  Occlude नाही
दाटुन आलय बघ Empyrean सारं
त्यालाही आता राहवत नाही
#Epic_love
#Dream_girl
#My_poems
#You_are_my_Shadow
#Nileshk256