Tuesday, March 21, 2017

वाट

काहूर माजलाय मनात
देवा एकदा यशाची वाट दाखव
झिजलेत प्रयत्न सारे
बळही संपले पंखांचे
भरारी घेण्या त्या पंखांना
एकदा सुखाची लाट दाखव
तूच आशा सगळी आता
तूच रे विधात्या
तहानलेल्या त्या स्वप्नांना
लढण्याची तू जिद्द दाखव
काहूर माजलाय मनात देवा
एकदा यशाची वाट दाखव
एकदा यशाची वाट दाखव
#nileshk256
-निलेश वि खरात