~~~नतमस्तक~~~
तुम्ही लढता सिमेवरती
म्हणून आम्ही ताठ मानेने जगतो
लढण्याचे धाडसी बळ तुमचे
आमच्या जगण्याला अर्थ देतो
येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना तोंड देण्या
ह्या देशाचा सैनिक सदैव सज्ज असतो
हिंदु मुस्लिम शीख इसाई नसतो कोणी
मातृभुमी रक्षण हा एकमेव धर्म असतो....
उर भरून येतो जेंव्हा
तुमच्या बलिदानाची वार्ता येते
आपसूक तुमच्या शौर्यापुढे
नतमस्तक हा देह होतो
नतमस्तक हा देह होतो
#Sandesh2Soldiers
#Salute
#Real_Heroes
#Thank_you
#Happy_Diwali_to_all
#nileshk256
#my_poems
Sunday, October 30, 2016
~~~नतमस्तक~~~
Tuesday, October 25, 2016
~~~ पाऊलखुणा~~~
बहरावे नाते ते
त्या अबोल धुक्यावाणी
फुलावे हास्य जणू
वाहे झऱ्यातून पाणी
व्हावी उधळण त्या रंगांची
जणू प्राजक्त तो फुलावा
खुणावतो मज तूच
ज्यात हा जीव गुंतावा
अश्या अनोळखी पाऊलखुणांचा
गधं ओळखीचा व्हावा
त्या दुहेरी ठस्यांचा
रेशमी बंध जुळावा ।।।
#निलेश_वि_खरात
#Hope #trust #love #care
#You_are_my_shadow
Subscribe to:
Posts (Atom)