Tuesday, October 25, 2016

~~~ पाऊलखुणा~~~

बहरावे नाते ते
त्या अबोल धुक्यावाणी
फुलावे हास्य जणू
वाहे झऱ्यातून पाणी

व्हावी उधळण त्या रंगांची
जणू  प्राजक्त तो फुलावा
खुणावतो मज तूच
ज्यात हा जीव  गुंतावा

अश्या अनोळखी पाऊलखुणांचा
गधं ओळखीचा व्हावा
त्या दुहेरी ठस्यांचा
रेशमी बंध जुळावा ।।।

#निलेश_वि_खरात
#Hope #trust #love #care
#You_are_my_shadow

No comments:

Post a Comment