पहाटेच्या सुर्योदया
बरोबर फुलते ती मैत्री...
स्तब्ध रात्रीच्या निरव शांततेत
निजते ती मैत्री...
कडकत्या उन्हात
सावली देणारी मैत्री...
गुलाबी थंडीत
मायेची उब मैत्री...
क्लासरुम मधल्या
धिंगाण्यात मैत्री...
कॉलेज कट्ट्यावर
रमते ती मैत्री...
अलवार हसण्यात
खुलते ती मैत्री...
नाकाच्या शेंड्यावरील रागात
रुसते ती मैत्री...
हळुवार जपावी लागते
जिवलग मैत्री...
अतुट विश्वासात
वसते ती मैत्री...
अडचणींवर सोबत मात करण्याची
ताकद म्हणजे मैत्री...
सहानभूती नसून
अमर्याद काळजी म्हणजे मैत्री...
रक्ताच्या नात्या पलीकडे
असते हि मैत्री...
सुख दुःखात एकमेकांचा
आधार म्हणजे मैत्री...
#Dedicated_to_all_beloved
#Friends_r_life
#Hope #Trust #Love #Faith
#Care #Smile #Joy
#Shaitans #Natkhat_boys
#सभु #STB
#my_poems
#nileshk256
Tuesday, September 6, 2016
...मैत्री...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment