Tuesday, December 3, 2013
Thursday, August 29, 2013
इतकी कशी ग तू गोड हसतेस
किती गोड हसणे तुझे हे
मनाला वेड लावते
नाजूक तुझ्या ह्या हसण्याने
मग स्वप्नांची ओढ लागते
इतके कसे देव सुंदर बनवतो कोणाला
बघनार्याला प्रेमातच पडावेसे वाटते
इतकी कशी ग तू गोड हसतेस
इतकी कशी ग तू गोड हसतेस....!
© निलेश वि. खरात
मनाला वेड लावते
नाजूक तुझ्या ह्या हसण्याने
मग स्वप्नांची ओढ लागते
इतके कसे देव सुंदर बनवतो कोणाला
बघनार्याला प्रेमातच पडावेसे वाटते
इतकी कशी ग तू गोड हसतेस
इतकी कशी ग तू गोड हसतेस....!
© निलेश वि. खरात
Sunday, June 30, 2013
भेट........
भेट आपली न ठरलेली
अशीच अचानक झालेली
तुझी ती मादक अदा
माझ्या ह्रदयासं भिडलेली
स्वप्नात बघितलेली घटना
सत्यात उतरलेली
अजुनही आठवते मला ती भेट पाय-यांवरची
माझ्या प्रश्नांची अन् तुझ्या अर्धवट उत्तरांची
अजुनही आठवते मला छटा तुझ्या त्या लाजण्याची
अन् आठवते ति संध्याकाळ तुझ्या नकाराची
आठवते मला आपली भेट ती पहिली अन अखेरची
नकळत घडलेली
- निलेश
अशीच अचानक झालेली
तुझी ती मादक अदा
माझ्या ह्रदयासं भिडलेली
स्वप्नात बघितलेली घटना
सत्यात उतरलेली
अजुनही आठवते मला ती भेट पाय-यांवरची
माझ्या प्रश्नांची अन् तुझ्या अर्धवट उत्तरांची
अजुनही आठवते मला छटा तुझ्या त्या लाजण्याची
अन् आठवते ति संध्याकाळ तुझ्या नकाराची
आठवते मला आपली भेट ती पहिली अन अखेरची
नकळत घडलेली
- निलेश
Wednesday, June 26, 2013
Tuesday, June 25, 2013
चारोळी .....!
तु ही अबोल
मी ही अबोल
मैत्रीचे रंग कसे बदलले
सत्यात उतरण्या आधी
स्वप्नातच का विखुरले
- निलेश वि. खरात
Saturday, June 22, 2013
माझे मित्र...!
माझ्या मित्रांचे ढंग निराळे
एकत्र असल्यावर काढतात सगळ्यांचे दिवाळे
एकमेकांची खेचण्यात असतात सगळे दंग
प्रत्येकजण आहे येथे दबंग
कुणी आहे दिल फेक
कुणी आहे लढाऊ
तर कुणी आहे रडके
पण कधी होत नाही आमचे एकमेकांत वाकडे
सगळेच आहेत समजुतदार आणि सरळ
प्रेमाच्या बाबतीत उडते सगळ्यांचीच तारांबळ
आयुष्याच्या वाटेवर मिळो सगळ्यांना दिशा
जन्मभर साथ राहू हीच करतो आशा
-निलेश वि. खरात
एकत्र असल्यावर काढतात सगळ्यांचे दिवाळे
एकमेकांची खेचण्यात असतात सगळे दंग
प्रत्येकजण आहे येथे दबंग
कुणी आहे दिल फेक
कुणी आहे लढाऊ
तर कुणी आहे रडके
पण कधी होत नाही आमचे एकमेकांत वाकडे
सगळेच आहेत समजुतदार आणि सरळ
प्रेमाच्या बाबतीत उडते सगळ्यांचीच तारांबळ
आयुष्याच्या वाटेवर मिळो सगळ्यांना दिशा
जन्मभर साथ राहू हीच करतो आशा
-निलेश वि. खरात
सर पावसाची ........!
पावसाच्या शांत सरिने
चिंब भिजवली तिला
नाजुक नाजुक गालांवर तिच्या
दवबिंदू दाटला
रुप तिचं ते देखणं होतं
काय ते तिच स्मितहास्य
अनं काय तिच ते मटकणं होतं
भुरळ घालेल कुणालाही
असं तिचं ते लाजणं होतं
कोमल असे तिचे ते हातं
ओल्या केसांना हलकेच सावरत होते
प्रेमळ असे ते पावसाचे थेंब
तिच्या केसांतुन झुरत होते
फक्त आणि फक्त
वेड मनाला लावत होते
आजही त्याच पावसाच्या
सरिची वाट पाहत आहे
स्वप्नं त्या परिचे
अजुनही मनी रंगवत आहे
येईल परत ती सरं जीवनी
ह्या आशेवर जगत आहे......
- निलेश वि. खरात
चिंब भिजवली तिला
नाजुक नाजुक गालांवर तिच्या
दवबिंदू दाटला
रुप तिचं ते देखणं होतं
काय ते तिच स्मितहास्य
अनं काय तिच ते मटकणं होतं
भुरळ घालेल कुणालाही
असं तिचं ते लाजणं होतं
कोमल असे तिचे ते हातं
ओल्या केसांना हलकेच सावरत होते
प्रेमळ असे ते पावसाचे थेंब
तिच्या केसांतुन झुरत होते
फक्त आणि फक्त
वेड मनाला लावत होते
आजही त्याच पावसाच्या
सरिची वाट पाहत आहे
स्वप्नं त्या परिचे
अजुनही मनी रंगवत आहे
येईल परत ती सरं जीवनी
ह्या आशेवर जगत आहे......
- निलेश वि. खरात
स्वच्छंदी मित्र ......!
स्वच्छंदी फुलपाखरा सारखा
आपला एक मित्र होता
आतोनात प्रेम आणि निखळ मैत्रीचा
जणु तो समुद्रच होता
थट्टा मस्करीचा तर तो राजा होता
मित्रांसाठी जीव देणारा तो वाघ होता
क्षणार्धात समोरच्याच मन जिँकणारा
तो आपला कोहिनुर होता
देवाने आपला हिरा हिसकावुन घेतला
आपल्याला नकळत दु:खात लोटुन दिला
त्याच्या मनात कधीच खोट नव्हता
मैत्रिपुर्ण असा त्याचा स्वभाव होता
आजही
प्रत्येकाच्या ह्रदयाचा
तो अविभाज्य घटक आहे
त्याची जागा आपल्या ह्रदयात
कायम राखिव आहे
त्याच्या नावाचा उल्लेख नसला
तरी आमच्या मनावर कोठेतरी त्याचा प्रभाव आहे
होता आणि राहिल....
- निलेश वि. खरात
कधीतरी चुकून......!
कधीतरी चुकून
तिला माझी आठवण यावी
आठवण आल्यावर ती
कावरी बावरी व्हावी
त्याच वेळी मी
तिची आठवण काढावी
आणि तिला उचकी लागावी
काही केल्या तिची
उचकी न थांबावी
कधीतरी चुकून
अशी संध्याकाळ यावी.....
कधीतरी तिला
माझ्या अस्तित्वाची जाणीव व्हावी
कधीतरी
तिच्या मनातील कोमल कळी
माझ्या नावाने उमलावी ......
कधीतरी चुकून
अशी संध्याकाळ यावी.....
--निलेश वि. खरात
....तुझ्या वरच माझ प्रेम ....
तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं
कुठ तरी दुर
डोंगराच्या पल्याड लपलयं ...
उघड्या डोळ्यानी तुझे
स्वप्न बघत बघत
हे ह्रदय आता थकलयं
तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं ...
आपण एकाच दोरिचे
दोन टोकं आहोत हे
आता ह्या वेड्या
मनाने ओळखलयं
तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं.....
तुझ्या ह्रदयातली
प्रेमाची कळी
माझ्यासाठीही
फुलेल कधीतरी
ह्या आशेवर
ह्रदयानं धडकनं बंद केलय
तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं....
तुझ्या आठवणीत त्यान
आता रमायचं सोडलयं
सगळ विसरुन
नव्यानँ सुरुवात करायची
असं ठरवलयं
तुझ्यावरचं माझं प्रेम
आता जरा रुसलयं
-निलेश वि. खरात
Subscribe to:
Posts (Atom)




