स्वच्छंदी मित्र ......!
स्वच्छंदी फुलपाखरा सारखा
आपला एक मित्र होता
आतोनात प्रेम आणि निखळ मैत्रीचा
जणु तो समुद्रच होता
थट्टा मस्करीचा तर तो राजा होता
मित्रांसाठी जीव देणारा तो वाघ होता
क्षणार्धात समोरच्याच मन जिँकणारा
तो आपला कोहिनुर होता
देवाने आपला हिरा हिसकावुन घेतला
आपल्याला नकळत दु:खात लोटुन दिला
त्याच्या मनात कधीच खोट नव्हता
मैत्रिपुर्ण असा त्याचा स्वभाव होता
आजही
प्रत्येकाच्या ह्रदयाचा
तो अविभाज्य घटक आहे
त्याची जागा आपल्या ह्रदयात
कायम राखिव आहे
त्याच्या नावाचा उल्लेख नसला
तरी आमच्या मनावर कोठेतरी त्याचा प्रभाव आहे
होता आणि राहिल....
- निलेश वि. खरात
No comments:
Post a Comment