अरे पावसा तुझा
मेळ काही कळेना
किती निष्ठुर तुझा
हा खेळ काही उमजेना..।
वाट तुझी रे किती बघायची
जीव टांगला वेशीला
पुरे झाला हा रुसवा आता
धरणी आसुसली भेटीला..।
जीव सर्वांचा तळमळला
हुलकावणी तुझी सुरूच आहे
डोळे दिपले आकाशाकडे
आता फक्त तुझीच आस आहे..।
नको रे देऊ पुन्हा
तू आमच्या हातावरती तुरी
ओसाड झालीत रे
सारी आता माळराणांची धुरी..।
सुकलेत डोळ्यातले अश्रू सारे
आता वेळ दवडवू नको
येरे वेड्या आता
इतका अंत पाहू नको..।
येणा एकदा बरसत जोरात
नेसु दे हिरवा शालु धरणीला
थोर होतील उपकार तुझे
देशील ओ जर हाकेला..।
आस तुझी रे फक्त पावसा
तृप्त कर तू भु मातेला
तृप्त कर तू भु मातेला..।
- निलेश वि खरात
औरंगाबाद .(9028104377)
No comments:
Post a Comment