तुझ्या अंगावर बरसणारा
तो पाऊस व्हायचंय मला
तू जेंव्हा पावसात भिजशील तेंव्हा
तुझ्या नाजूक हातांवरून ओघळणारा अन
ओल्याचिंब केसांतून झुरणारा
तो पावसाचा थेंब व्हायचंय मला..
पावसाच्या सरींना ओंजळीत घेशील तेंव्हा
त्या ओंजळीतली सर व्हायचंय मला
पावसाच्या थेंब जमिनीवर पडेल
तेंव्हा तुझ्याया श्वासातून शरीरात जाणारा
तो सुगंध व्हायचंय मला
#पहिला_पाऊस
#स्वप्नपरी
#पावसाची_सर
#तु_माझी_सावली
#epic_love
#nileshk256
No comments:
Post a Comment