Tuesday, August 2, 2016

सोनपरी

उमलता कळी ती चाफ्याची
नादावला बघ तो अल्लड वारा
अबोल तुझ्या त्या नजरेने
मनी फुलला मोर पिसारा

तुझ्या सावलीच्या चाहुलीने
सुखावला बघ तो चंद्र सारा
निरागस तुझ्या हास्याने
वेडावला हा जीव बावरा....

#सोनपरी
#स्मितहास्य
#माझ्या_कविता
#nileshk256
#औरंगाबाद
#९०२८१०४३७७

No comments:

Post a Comment