समोर येता हडबडणारी
डोळ्यांनीच सर्वकाही बोलून जाणारी
गालातल्या गालात गोड हसणारी ...तू
निरागस चेहरा अबोल शब्द
स्वतःच्याच भाव विश्वात रमणारी ...तू
कोणी काही उलट सुलट बोललं तर शब्दांना धार लावून भड भड रागावणारी ...तू
स्वतःलाच कच्चा लिंबू ,ढ म्हणून घेणारी अन खडूस असण्याचा आव आणणारी ...तू
जशी शांत पावसाची सर यावी अन मनाला प्रसन्न करून जावी
अशी नशिबाने लाभणारी मैत्रीण ...तू
#मैत्रीण
#निरागस
#खडूस
#माझ्या_कविता
#nt_besties_frnds_by_luck
#nileshk256
No comments:
Post a Comment